Rain : राज्यात आत्तापर्यंत 485.10. मिमी पाऊस, कोकणात सर्वात जास्त पाऊस
आत्तापर्यंत राज्यात झालेल्या पावसाची आकडेवारी हवामान विभागानं जारी केली आहे. राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
1 जून ते 24 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 458.4 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात 485.10. मिमी पाऊस कोसळला आहे.
कोकणात (Konkan) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागानं (imd) दिली आहे.
आत्तापर्यंत कोकणात 123 टक्के, विदर्भात 108 टक्के, मराठवाड्यात 96 टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 90 टक्के पावसाची नोंद
राज्यातील 21 जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे.
आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
सात जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. यामध्ये सांगली, हिंगोली, सोलापूर, सातारा, जालना, अहमदनगर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे.
आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.