Ratnagiri Accident: मुंबई-गोवा हायवेवर एलपीजी टँकर उलटला, गॅस गळतीमुळे घबराट, वाहतूक ठप्प!

हातखंबा येथे एलपीजी टँकर पुलावरून कोसळला हा अपघात 29 जुलै रोजी रात्री घडला. गॅस गळतीमुळे घबराट, रेस्क्यू टीम सक्रिय, नागरिक हलवले, महामार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंद.

मुंबई-गोवा महामार्ग अपघात

1/10
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावाजवळ एक गंभीर अपघात घडला असून, एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले असून, टँकर उलटल्यानंतर त्यामधून गॅसची गळती सुरू झाली , ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
2/10
ही घटना काल, 29 जुलैच्या रात्रीच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि गॅसची गळती तात्पुरती रोखली. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने जवळपासच्या परिसरातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
3/10
तसंच, आसपास राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे . पण अजूनही मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंदच आहे, त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या मार्गांचा वापर करण्यास सांगितलं जात आहे.
4/10
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण गेल्या सात तासांपासून हा रस्ता बंद आहे.
5/10
दुसरीकडे, गेल्या दोन महिन्यांत घडलेली ही दुसरी अशा प्रकारची घटना आहे. आत्ता अपघातग्रस्त टँकर सरळ करण्याचे काम सुरू आहे आणि तो सरळ झाल्यावर त्यातील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये हलवला जाणार आहे.
6/10
हातखंबा गावातील वाणी पेठ परिसरात राहणारे सुमारे 100 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
7/10
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत आणि टँकर हटवून रस्ता सुरक्षित होईपर्यंत, वाहतूक सुरू केली जाणार नाही, असं सांगितलं जात आहे.
8/10
मुंबईतील विरारमध्ये रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाला असून, 26 वर्षांचा अनिकेत शिंदे नावाचा तरुण जखमी झाला आहे. त्याच्या हात, पाय आणि छातीत गंभीर दुखापत झाली आहे.
9/10
हा अपघात विरार पूर्व रेल्वे स्थानक ते विरार फाटा जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाला आहे. वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
10/10
या रस्त्यावरून जाताना अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिक मागणी करत आहेत की महापालिकेने रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरावे.
Sponsored Links by Taboola