Bus Fire In Latur: लातूरमध्ये खाजगी बसला भीषण आग, प्रवाशांच्या सामनासह बाजूचे दुकान अन् घरही जळून खाक, लाखोंचं नुकसान

Bus Fire In Latur: लातूरमधील औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.

Bus Fire In Latur

1/6
औसा शहरातील मुख्य रस्त्यावर आज सकाळी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. पुण्यावरून लातूरकडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने औसा शहरात आल्यानंतर अचानक पेट घेतला. वेग कमी झाल्याच्या क्षणी टायर फुटल्याने आग लागली आणि काही क्षणांतच ती भीषण स्वरूप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली.
2/6
सुदैवाने, आग लागण्याआधीच आतील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचे सामान आणि वैयक्तिक साहित्य पूर्णतः जळून गेले.
3/6
आगीचा भडका इतका मोठा होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला आणि घरालाही आग लागली. या दोन्ही ठिकाणीही मोठे नुकसान झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचा माल खाक झाला आहे.
4/6
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले, पण तोपर्यंत ट्रॅव्हल्स, दुकान आणि घराचा मोठा भाग नष्ट झाला होता.
5/6
प्रवाशांचा जीव वाचवला असला तरी, मालमत्तेचे झालेले नुकसान आणि प्रवासादरम्यानची ही भीषण घटना प्रवाशांचा थरकाप उडवणारी आहे.
6/6
औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस केली. तात्काळ प्रशासनास सूचना केल्या.
Sponsored Links by Taboola