Kondeshwar Temple Waterfall : खुशखबर! पहिल्याच पावसात बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची एकच गर्दी
Kondeshwar Temple Waterfall : राज्यासह मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वरचा धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित झालाय.
Kondeshwar Temple Waterfall
1/9
Kondeshwar Temple Waterfall : राज्यासह मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वरचा धबधबा प्रवाहित झालाय.
2/9
त्यामुळे बदलापूरसह मुंबईतील पर्यटकांची पावसाळी पर्यटनासाठी पावलं कोंडेश्वरकडे वळू लागली आहेत.
3/9
बदलापूर पासून 7 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणचं निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावत असतं.
4/9
जून महिन्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी पाहायला मिळते.
5/9
मात्र यावेळी पहिल्यांदाच मे अखेरीस हा धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय.
6/9
त्यामुळं पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी केलीय.
7/9
या धबधब्यात आतापर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना इथे येण्यास मनाई केली जाते.
8/9
मात्र यंदा मान्सूनचं लवकर आगमन झाल्यामुळे बंदी आदेश लागू होण्यापूर्वीच पर्यटकांची पावलं कोंडेश्वर धबधब्याकडे वळू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
9/9
या परिसरात शंभू महादेवाचे मंदिर असून कोंडेश्वर महादेव मंदिराच्या नावावरूनच या या धबधब्याला कोंडेश्वर धबधबा बोललं जात असल्याचे स्थानिक सांगतात.
Published at : 27 May 2025 10:09 AM (IST)