करवीर निवासिनी अंबाबाईची चौथ्या माळेला कुष्मांडारूपात पूजा
नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची कुष्मांडारूपात पूजा बांधण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुष्मांडा हे नवदुर्गांपैकी चौथे रूप आहे. आपल्या ईश्वरी हास्यातून या देवीने ब्रह्मांडाची रचना केली. सूर्यलोकांत तिचा निवास असून, ती तेज आणि चैतन्याने परिपूर्ण आहे.
उद्या गुरुवारी ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार आहे.
श्री कुष्मांडा देवी ही अष्टभूजादेवी असून, तिच्या हातात कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृतकलश, चक्र, गदा आहे. आतल्या हातात सर्व सिद्धी व धनसंपत्ती देणारी माळ आहे.
तिचे वाहन सिंह आहे. तिच्या शरीराचे तेज आणि कांती सूर्यासारखी तेजस्वी, देदीप्यमान आहे. या तेज व प्रकाशामुळे दाहीदिशा प्रकाशमान होतात.
संस्कृतमध्ये कोहळ्याला कुष्मांड म्हणतात. देवीच्या होमहवनात कोहळ्याचे समर्पण केले जाते.
नवरात्रोत्सवात चतुर्थीला कुष्मांडा देवीची उपासना केली जाते.
ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.