Eknath Shinde In Kolhapur : मी कोल्हापुरात आलो की काहींच्या पोटात दुखतं, इथं येण्याची बंदी आहे का? सीएम एकनाथ शिंदेंची सतेज पाटलांवर टीका

कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आता भेटणारा खासदार निवडून देणे तुमची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

भेटण्यासाठी तिकीट काढून टोल द्यावा लागणारा खासदार निवडू नका असे त्यांनी सांगितले.
मी तिथे आलो की काहींच्या पोटात दुखायला लागतं, इथे येण्याची बंदी आहे का? अशी विचारणा करत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली.
मी आजच इथं आलो नाही तर कोल्हापूरच्या महापुरात आणि कोरोना काळात देखील इथे येऊन मदत केल्याचे ते म्हणाले.
आरोग्य मंत्री म्हणून केलेल्या मदतीमुळे तसेच कोल्हापुरात उद्भवलेल्या महापुरात रोगराई पसरली नसल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या 7 मे रोजी महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले.
पीएम मोदींची दहा वर्ष महायुतीची दोन वर्ष लोकांसमोर असल्याचे ते म्हणाले.
संजय मंडलिकांना दिल्लीत पाठवून मोदींचे हात कोल्हापूर बळकट करणार असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची यशस्वी सांगता करण्यात आली.