Kolhapur Weather Update : कोल्हापुरात 29 मेपर्यंत यलो आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट; पावसाची संततधार कायम

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गगनबावडा आणि भुदरगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होत आहे. सहा बंधारे पाण्याखाली आहेत.

Kolhapur Weather Update

1/10
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे.
2/10
गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गगनबावडा आणि भुदरगड तालुक्यात पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे.
3/10
दुसरीकडे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला आहे.
4/10
हवामान विभागाने 29 मेपर्यंत कोल्हापुरात यलो आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट दिला आहे.
5/10
येत्या 36 तासांत कोल्हापूर शहर आणि घाट परिसरातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
6/10
पुढच्या दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे.
7/10
दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.
8/10
पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
9/10
मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
10/10
दुसरीकडे, मुंबईत आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Sponsored Links by Taboola