Dog Show in Kolhapur : कोल्हापुरात आयोजित 'डॉग शो'ला अभूतपूर्व प्रतिसाद
कोल्हापुरात आयोजित 'डॉग शो'ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेनेल असोसिएशन कोल्हापूरच्यावतीने आयोजित डॉग शो च्या दुसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभागी होत अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
पंजाब येथील जज श्री कोमल धनवा आणि आणि कोइंबतूर येथील जज डॉ. व्ही एस रवी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
जर्मन शेफर्ड रॉटविलर गोल्डन रिट्रीवर डॉबरमॅन लाब्राडोर सायबेरियन हस्की यासारख्या लोकप्रिय ब्रिडने लक्ष वेधले.
फॉक्स टेरियर, सायमनौड, ब्रिटिश Bulldog, पशमी, व्हिपेट यासारख्या दुर्मिळ जातीच्या श्वानांची स्पर्धेतील उपस्थिती प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होती.
कोल्हापूरकरांनी या डॉग शो ला मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं.
संपूर्ण दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत सातारा येथील संग्राम शिंदे यांच्या रॉटविलर जातीच्या श्वानाने आणि कोल्हापूरच्या ऐश्वर्या माणगावे यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाने बेस्ट इन शो चा किताब पटकावला.
सातारा येथील संदीप तोडकर यांच्या ग्रेट डेन जातीच्या श्वानाने बेस्ट पप्पी इन शोचा किताब पटकावला.
तर कोल्हापूरच्या सुमित माणगावे यांना बेस्ट हँडलर या किताबाने सन्मानित करण्यात आले.
डॉग शो साठी प्रदीर्घकाळ कार्य केलेले बिहार पाटील आणि विलास सावेकर यांनाही सन्मानित करण्यात आले.
एकंदरीतच कोल्हापुरात तब्बल चार वर्षानंतर झालेल्या या डॉग शो मुळे कोल्हापूरकरांना विविध जातीचे श्वान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.