Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव
कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापुरात याबाबत माहिती दिली.
ज्योतिरादित्य शिंदे दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत
शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनस इमारतीच्या कामाची पाहणी करून दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या मंत्रालयाकडून प्रस्ताव मंजूर करून आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार आहे, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये क्रांतीकारी परिवर्तन झाल्याचे शिंदे म्हणाले.
2014 पूर्वी 98 वर्षात देशात 74 विमानतळ होते. केवळ 9 वर्षात आणखी 74 विमानतळे झाल्याचे ते म्हणाले.
विमानतळांची संख्या 220 पर्यंत नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी प्रतिदिन 13 किमी वेगाने राष्ट्रीय महामार्ग तयार होते होते, आता तिप्पटीने 36 किमी प्रतिदिन महामार्ग होत असल्याचे शिंदे म्हणाले.