Jyotiraditya Shinde : शिराळामध्ये पूर्वीप्रमाणे नागपंचमी होण्यासाठी प्रयत्न करणार; ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही

शिराळामध्ये पूर्वीप्रमाणे नागपंचमी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना याबाबत माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.

Jyotiraditya Shinde

1/10
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
2/10
त्यांच्या उपस्थितीत आज शिराळामध्ये मेळावा पार पडला.
3/10
यावेळी भाजपचे अनेक स्थानिक नेते पदाधिकारी उपस्थित होते.
4/10
लोकसभा प्रवास अभियानांतर्गत कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
5/10
सर्वसामान्य जनतेस केंद्रभूत ठेवूनच केंद्र सरकारने विविध योजना अंमलात आणल्या असल्याचे ते म्हणाले.
6/10
त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमीच प्रयत्नशील असतात, असेही त्यांनी सांगितले.
7/10
लोकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी इथून पुढेही कार्यरत राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
8/10
शिराळामध्ये पूर्वीप्रमाणे नागपंचमी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
9/10
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना याबाबत भेटून सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
10/10
भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
Sponsored Links by Taboola