भारतीय रेल्वेकडून 29 जुलै आणि 12 ऑगस्टला सहल, या मार्गावर भारत गौरव ट्रेन चालवणार!
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ 3 आणि ‘देखो अपना देश’ या भारत सरकारच्या उपक्रमात पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी 29 जुलै आणि 12 ऑगस्टला यशवंतपूर-बनारस-यशवंतपूर भारत गौरव ट्रेन चालवणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयआरसीटीसी टुरिस्ट ट्रेन एक सर्वसमावेशक टूर पॅकेज आहे.
यातून प्रवाशांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे.
या दोन्ही रेल्वे गाड्या सकाळी साडे दहा वाजता यशवंतपूरहून सुटणार आहे.
दक्षिण, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वे मार्गे बनारसला पोहोचेल.
हीच ट्रेन 30 जुलै आणि 13 ऑगस्टला रोजी मिरज, पुणे, दौंड मार्ग, मनमाड, भुसावळ आणि खांडवा येथे थांबून दक्षिण पश्चिम मार्गाने मध्य रेल्वेला पोहोचेल आणि पश्चिम मध्य रेल्वेमार्गे पुढील प्रवास करेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी बनारसहून 1 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला सुटेल.
४ ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला पश्चिम मध्य मार्गाने, खांडवा, भुसावळ, मनमाड, दौंड मार्गे, पुणे आणि मिरज स्थानकांवरून मध्य रेल्वेला पोहोचेल. दक्षिण पश्चिम रेल्वेमार्गे पुढे प्रवास करेल.
या रेल्वेला एलएचबी रेक 11 एसी 3 -टायर, 1 पॅन्ट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन असे डबे व सुविधा आहेत.
त्यामुळे सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव येणार आहे.