Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे खांब वाळवीने पोखरले
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या गरुड मंडपाचे अनेक खांब अडकमधून अर्धवट निखळल्याचे समोर आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हे खांब का निखळले याचा शोध घेतला होता.
गरुड मंडपाचे मुख्य आठ खांब वाळवीने पोखरले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
1839 पासून गरुड मंडप हा अंबाबाई मंदिराचा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे गरुड मंडपाला अनन्य साधारण महत्व आहे.
पण हाच मंडप धोकादायक असल्याचं दिसून आलं आहे.
या खांबाच्या शेजारी असणारी फरशी काढल्यानंतर हे वास्तव समोर आलं आहे.
त्यामुळे देवस्थान समितीने तातडीची उपाययोजना सुरु केली आहे.
वाळवीने पोखरलेला काही भाग कट करुन त्याच्याखाली दगडी चौथराचा आधार देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.
फरशी काढण्यात आल्यानंतर लाकडी खांब वाळवीने पोखरल्याचे समोर आले होते. त्यानंतर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.