In Photos Kolhapur Circuit Bench: तब्बल दीडशे वर्षांपूर्वी बांधलेली कोल्हापूर सर्किट बेंचची इमारत अवघ्या 25 दिवसात नव्याने सजली
Kolhapur Circuit Bench: या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे. अवघी करवीरनगरी सर्किट बेंचच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
Kolhapur Circuit Bench
1/10
कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा आज कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राऊंडवर होत आहे.
2/10
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक अराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
3/10
सर्किट बेंच सीपीआरसमोरील दीडशे वर्षांपूर्वी 1874 मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीमध्ये सुरु होत आहे.
4/10
न्यायालयाच्या परिसराचा अवघ्या 25 दिवसात कायापालट करण्यात आला आहे.
5/10
न्यायालयसमोरील संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्यात आलं आहे. नो पार्किंग आणि नो हाॅकर्स परिसर करण्यात आला आहे.
6/10
क्रांती उद्यानामध्येही कारंजा कार्यरत करण्यात आला असून पदमार्गही नव्याने करण्यात आला आहे.
7/10
राधाबाई इमारतीमध्ये ग्रंथालय, नोंदणी विभाग व व्हिडीओ कॉन्फरन्स रुमचे कामकाज होणार आहे.
8/10
सर्किट बेंचसाठी 9 हेक्टर 18 आर जागा शेंडा पार्क येथे प्रस्तावित करण्यात आली आहे.
9/10
या जागेसाठी शासनाची मान्यता मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिली.
10/10
कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्यापासून (18 ऑगस्ट) कामकाज सुरु होत आहे. न्यायमूर्ती आणि प्रशासकीय कामासाठी स्टाफ सुद्धा नियुक्त करण्यात आला आहे.
Published at : 17 Aug 2025 11:30 AM (IST)