Shivaji University : दिमाखात पार पडला शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
शिवाजी विद्यापीठाच्या 59 व्या दीक्षांत समारंभानिमित्त पदवीसमवेत छायाचित्रे काढून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वर्तुळ उद्यानामध्ये जमलेल्या विद्यार्थिनींचा उत्साह असा ओसंडून वाहत होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवाजी विद्यापीठाच्या 59 व्या दीक्षान्त समारंभानिमित्त पदवीसमवेत छायाचित्रे काढून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वर्तुळ उ्द्यानामध्ये झालेली विद्यार्थिनींची गर्दी.
पदवीसमवेत छायाचित्रे काढून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वर्तुळ उद्यानामध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत होते.
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा भवन क्रमांक 2 च्या प्रांगणात पदवी घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची परीक्षा विभागाच्या स्टॉलवर मोठी गर्दी झाली.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाची दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. संजय धांडे यांनी मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठाच्या 59 व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस.
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सोहम जगतापला कुलपतींचे सुवर्णपदक प्रदान करताना प्रा. संजय धांडे.
शिवाजी विद्यापीठाच्या 59 व्या दीक्षांत समारंभात महेश बंडगरला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करताना प्रा. संजय धांडे. मंचावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव.
विद्यार्थ्यांनी ‘लाईफ लाँग लर्नर’ अर्थात आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत व्यग्र राहावे आणि काळानुरुप आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन कानपूर विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांनी आज येथे केले.