कोल्हापूरकरांचा अनोखा निषेध; कचऱ्याचीच निघाली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून रंकाळा टाॅवर परिसरातील कचरा उठाव होत नसल्याने सजग नागरिकांनी कचऱ्याची प्रतीकात्मक तिरडी बांधून अंत्ययात्रा काढली.

Symbolic Funeral Procession of Garbage In Kolhapur
1/10
कोल्हापुरात कचरा उठाव गंभीर झाला असतानाच रंकाळा चौपाटीवर अनोखे आंदोलन करण्यात आले.
2/10
कोल्हापुरात रंकाळा तलाव चौपाटीवर कचऱ्याचे ढीग साचल्याने कचऱ्याचीच प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत मनपा प्रशासनाचा निषेध केला.
3/10
कचऱ्याच्या प्रतीकात्मक तिरडीवर 'मला येथून कायमचा उचला' असा फलक लावण्यात आला होता
4/10
रंकाळा टाॅवरशेजारी महादेव मंदिर परिसरात कचरा तसाच पडून होता.
5/10
यावेळी कचऱ्याची तिरडी बांधून नागरिकांनी बोंब मारली.
6/10
कोल्हापुरात पर्यटकांची मोठी गर्दी रंकाळा परिसरात होत आहे.
7/10
पर्यटकांकडून खाद्यपदार्थ खाऊन कचरा त्याठिकाणीच टाकला जातो.
8/10
मात्र, या कचऱ्याचा उठाव आरोग्य विभागाकडून केला जात नाही.
9/10
त्यामुळे नागरिकांनी एकत्र अभिनव आंदोलन करून लक्ष वेधलं
10/10
किमान या अभिनव आंदोलनानंतर तरी कचरा उठाव केला जाईल, अशी माफक अपेक्षा आहे.
Published at : 10 Nov 2025 10:22 AM (IST)