कोल्हापूर : हसन मुश्रीफांच्या वाढदिनी समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची मातब्बर नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आणि रामनवमीचे औचित्य साधत आज मुश्रीफ समर्थकांकडून कागलमधील राम मंदिर, करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर आणि जोतिबा डोंगरावर महाआरती करण्यात आली.
मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघामध्ये विविध जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
वाढदिवस दणक्यात करण्यासाठी समर्थकांनी चांगलीच कंबर कसली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीकडून झालेल्या छापेमारीमुळे अडचणीत आहेत.
त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज वाढदिवस समर्थकांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन केले आहे.
कागल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील ग्रामदैवतला अभिषेक,महाआरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाप्रसादाचे वाटप केलं जाणार आहे.
कागल शहर मर्यादित रामनवमीला जन्माला आलेल्या मुलीच्या नावे 5000 रुपयांची ठेव, शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, वह्या वाटप, कॅन्सरग्रस्त लहान मुलांना साहित्याचे वाटप, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आला आहे.
दरम्यान, कागल शहरामध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी कमान उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करून समर्थक पाठीशी असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.