Sumangalam Lokotsav : कणेरी मठातील पंचमहाभूत लोकोत्सव पाहण्यासाठी गर्दीचा महापूर

कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावर सुमंगलम लोकोत्सव सोहळा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या लोकोत्सवाचा आज (22 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे.

लोकोत्सवातील स्टाॅल्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
या लोकोत्सवात हजारांहून अधिक स्टाॅल्स आहेत.
लोकोत्सव होत असलेल्या परिसरात करण्यात आलेली रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.
प्रदर्शनासह व्याख्याने ऐकण्यासाठीसुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
लोकोत्सवातील देखाव्यातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन मुख्य आकर्षण आहे.
दिवसाच्या तुलनेत सायंकाळी लोकोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
नष्ट होत चाललेल्या गाढवांचे आजपासून प्रदर्शन सुरु झालं आहे.
इतर पाळीव प्राण्यांचे प्रदर्शनही सुरु झालं आहे.
लोकोत्सवातून पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील दिग्गज व्यक्ती सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती लावत आहेत.
अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहाणी या लोकोत्सवात उलघडणार आहेत.
या महोत्सवातून पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृद्धी, सेंद्रिय शेतीचा प्रसार, यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.