अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी त्यांचे स्वागत केले.
ज्ञान, भक्ती व कर्म या त्रिसूत्रीतून जीवन सर्वांग सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी दिला
तपोवन मैदानात आयोजित महासत्संग सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते.
आपल्या सर्वांमध्ये प्रेम आहे, आनंद आहे पण ती व्यक्त करण्याची कला प्रत्येकाला आली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी शेतकरी दाम्पत्याने श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते कोल्हापुरी सेंद्रिय गुळाचे पूजन करुन घेतले.
तपोवन मैदानात श्री श्री रविशंकर यांनी 20 मिनिटे ध्यानधारणा करण्यास सांगितल्याने मैदानात नीरव शांतता पसरली होती.
ध्यानसाधनेमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती पाच पटीने वाढत असल्याचे ते म्हणाले.
शरीर कमजोर असले, तरी मन कमजोर होऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
मैदानावर उभारण्यात आलेल्या 300 फूट रॅम्पमुळे भक्तांना श्री श्री रविशंकर यांचे जवळून दर्शन मिळाले