जोतिबा डोंगरावर उद्या श्रावणषष्ठी यात्रा, भाविकांसाठी 'या' आगारातून एसटी बसेसची सोय
Jotiba : यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात. सांगली, सातारा, कराड आगारातून एसटी महामंडळाने जादा एसटी बसेसची सोय केली आहे.
Jotiba Mandir
1/10
जोतिबा डोंगरावर उद्या (22 ऑगस्ट) चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा होत आहे.
2/10
प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
3/10
यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.
4/10
दुसऱ्या दिवशी बुधवारी धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होईल.
5/10
भाविकांसाठी देवस्थान समितीकडून मंदिर परिसरात दर्शन मंडपामध्ये लोखंडी ग्रील, मॅटची व्यवस्था केली आहे.
6/10
जोतिबा डोंगरावर रिकाम्या जागेत सपाटीकरण करण्यात आले आहे.
7/10
पार्किंग परिसरात लाईटची सोय करण्यात आली आहे.
8/10
यात्रेत भाविकांना कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले आहे.
9/10
सांगली, सातारा, कराड आगारातून एसटी महामंडळाने जादा एसटी बसेसची सोय केली आहे.
10/10
जोतिबा ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावात स्वच्छता व औषध फवारणी करण्यात आली आहे.
Published at : 21 Aug 2023 06:55 PM (IST)