कोल्हापूर : देशाला भाजपमुक्त केले नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही; सतेज पाटलांचा घणाघात
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसची जनसंवाद यात्रा भर पावसात पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसातून यात्रा पार पडल्यानंतर दसरा चौकात सभा झाली.
येत्या निवडणुकीत देशाला भाजपमुक्त केले नसल्यास पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असा घणाघात सतेज पाटील यांनी केला.
पुढील पिढीच्या भविष्यासाठी परिवर्तनाच्या लढाईला सज्ज होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात काँग्रेसतर्फे तीस सप्टेंबरपासून जनसंवाद पदयात्रेला प्रारंभ झाला आहे.
भाजपकडून गेल्या नऊ वर्षांत द्नेषाचे राजकारण केले जात असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली घटनाच नव्हे तर देशाचा इतिहासच बदलला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अमृत फक्त अदाणी आणि अंबानीसाठी आणि उर्वरित देशासाठी काळ आहे, हे आता लोकांच्या लक्षात आलं असल्याचा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.
बेरोजगारी, महागाई असो किंवा प्रत्येक प्रश्नाबाबत भाजपकडून लोकांची दिशाभूल होत असल्याचे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले.
देशातील दडपशाहीच्या वातावरणात जनतेला विश्वास द्यावा लागणार असल्याचे आमदार जयश्री जाधव म्हणाल्या.