Jyotiraditya Shinde : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचा आढावा
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा आढावा घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीतील अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी ऑनलाइन बैठक घेतली.
त्यांनी प्रलंबित कामांची माहिती घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
यासाठी 26 हेक्टर जमीन आवश्यक आहे.
त्यामधील 10 हेक्टर संपादित करायची आहे. भूसंपादनाचे कामही गतीने सुरू आहे.
विस्तारित कामांमध्ये पार्किंग, धावपट्टी, टर्मिनल, कार्गो या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामे कोणती आहेत, त्यातील किती काम पूर्ण झाले आहे, किती अद्याप बाकी आहे, त्यासाठी किती कालावधी लागणार आहे या सर्व बाबींची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
जी कामे रखडली आहेत, त्यातील समस्या तातडीने दूर करून विस्तारीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
या वेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.