कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन उत्साहात; धनंजय महाडिक, सतेज पाटील, हसन मुश्रीफांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण

कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ तसेच ऋतुराज पाटील यांनी विविध ठिकाणी ध्वजारोहण केले.

Republic Day 2023

1/9
खासदार धनंजय महाडिक यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पेठेतील पंत अमात्य बावडेकर आखाडा येथे ध्वजारोहण केले.
2/9
यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
3/9
नागरिकांना सार्वभौम ठरवणारं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणलं गेलं. एक स्वतंत्र नागरिक म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्ये जाणून घेऊन त्याप्रमाणे वागणे हीच खरी स्वातंत्र्यसैनिकांना दिलेली मानवंदना ठरेल, असं मत यावेळी व्यक्त केलं.
4/9
यावेळी रोहित मोरे, अमर साळोखे, सतीश शिंदे, रवी जरग, इंद्रजीत महाडेश्वर, शिवराज मोरे, संग्राम सरनाईक, अशोक साळोखे, विजय पाटील, विजय मोरे आदी व नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5/9
आमदार सतेज पाटील यांनी मौनी विद्यापीठात ध्वजारोहण केले.
6/9
सतेज पाटील मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत.
7/9
यावेळी विद्यार्थ्यांंनी संचलन केले.
8/9
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
9/9
डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डी. वाय. पाटील उद्योग समूहातील संलग्न आस्थापनांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले.
Sponsored Links by Taboola