Raju Shetti : राजू शेट्टींनी बैलगाडीने दाखल केला उमेदवारी अर्ज; समर्थक, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Hatkanangale LokSabha : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभेला विराट शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
Raju Shetti
1/10
राजू शेट्टी यांनी आज विराट शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
2/10
संघटनेतील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
3/10
दसरा चौकातून त्यांनी बैलगाडीने जात उमेदवारी अर्ज दाखल केला.
4/10
तत्पूर्वी, जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह जयंत पाटील आणि सतेज पाटलांवर तोफ डागली.
5/10
खोक्याचा बाजार करणारी झुंड एका बाजूला माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे , विचारवंत माझ्यासोबत असल्याचे ते म्हणाले.
6/10
सगळे कारखानादार हातकणंगलेमध्ये काड्या करण्यात सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.
7/10
आधी उद्धव ठाकरे उमेदवार देणार नव्हते, पण चाव्या कोठून फिरल्या माहीत नाही, यामध्ये जयंत पाटील, सतेज पाटील असावेत, असा टोला त्यांनी लगावला.
8/10
विरोधकांतील काहीजण ईडीला घाबरून जातील भाजपत, पण ईडीला मी हिंगलत नाही, मला पाठवावी नोटीस एकदा, असे आव्हान त्यांनी दिले.
9/10
ईडी कार्यालयावरच मोर्चा काढावा अशी परिस्थिती, असल्याचे ते म्हणाले.
10/10
स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून यापुढी लढा विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगारासाठी उभारणार असल्याचे ते म्हणाले.
Published at : 15 Apr 2024 02:58 PM (IST)