Rahul Gandhi disqualified : कोल्हापुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; पीएम नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी
कोल्हापुरात काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप विरोधात आणखी आक्रमक आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
कोल्हापुरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून निदर्शने करण्यात आली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या मार्गदर्शनात पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन करण्यात आल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनात आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजु बाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह आमदार जयश्री जाधव उपस्थित होत्या.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या सत्याग्रह आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी भाजपच्या विरोधात आणखी आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
राहुल गांधी याची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आज दिल्लीतही प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी राजघाटवर आंदोलन केले.