Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीचे उगमस्थान प्रयाग चिखलीला पुराच्या पाण्याचा वेढा; नदीने इशारा पातळी ओलांडली
Kolhapur Rain Update: प्रयाग संगमाच्या ठिकाणी कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भोगावती या नद्यांचा संगम होत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाला असून ते आसपासच्या शेतामध्ये देखील गेल आहे.
Continues below advertisement
Kolhapur Rain Update (Dron सौजन्य : अक्षय राणे)
Continues below advertisement
1/12
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे.
2/12
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
3/12
पंचगंगा नदीचे उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय झाला आहे.
4/12
प्रयाग संगमावर कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भोगावती या नद्यांचा संगम होतो
5/12
संगमाच्या परिसरात असलेली मंदिर देखील पाण्याखाली गेली आहेत.
Continues below advertisement
6/12
शेतीमध्ये देखील पुराचे पाणी शिरलं आहे.
7/12
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 109.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
8/12
कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 40 फूट 2 इंचावर गेली आहे.
9/12
जिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली असल्याने थेट संपर्क तुटला असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.
10/12
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून धरणाच्या एकूण स्वयंचलित 7 दरवाजांपैकी 4 दरवाजे बंद झाले आहेत.
11/12
राधानगरी धरणाचे सध्या 3 दरवाजे खुले आहेत.
12/12
अलमट्टी धरणाचा विसर्ग आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 2 लाख क्यूसेक्स वरुन 2 लाख 50 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे..
Published at : 20 Aug 2025 12:54 PM (IST)