kolhapur News : गौरी गणपतीसाठी कोल्हापूर एसटी विभागातून पुण्याहून 220 जादा फेऱ्यांचे नियोजन
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटीकडून कोल्हापूर विभागाकडून 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान अतिरिक्त फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानुसार पुणे, मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण, कणकवली, सांगली, इस्लामपूर, बेळगाव या मार्गांवर खास पुण्याहून 220 जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
एसटीच्या मुंबई व ठाणे विभागांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुमारे 200 बसेस सोडण्यात येणार आहेत.
पुणे (स्वारगेट, पिंपरी चिंचवड, निगडी, हिंजवडी) येथून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी 220 जादा फेऱ्या असणार आहेत.
जादा फेऱ्यांची सोय 15 ते 18 सप्टेंबर या कालावधीत असणार आहे.
गणेशोत्सव कालावधीमध्ये विभागांतर्गत प्रवाशांमध्ये वाढ होत आहे.
कोल्हापुरातून इस्लामपूर, सांगली, मिरज, निपाणी, बेळगाव, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चंदगड या मार्गांवरही प्रवासी उपलब्धतेनुसार जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आलं आहे.
गावी येणाऱ्या भाविकांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ दरवर्षी कोकण मार्गावर जादा गाड्या सोडते.
पुणेतून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची सुविधा आहे.
ई तिकीट आरक्षण सुविधेचा लाभ घेत प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.