kolhapur Rain Update: पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर; कोल्हापूर जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोसमात प्रथमच पंचगंगा नदी बुधवारी रात्रीच्या अकराच्या सुमारास पात्राबाहेर पडली.
गुरुवारी (20 जुलै) सायंकाळी चारपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे.
पंचगंगेची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे.
जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अत्यंत वेगाने वाढ झाली आहे.
पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख 122 जिल्हा आणि 24 राज्य मार्गांपैकी तीन जिल्हा व दोन राज्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या दमदार जिल्ह्यातील विविध नद्यांवरील 53 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरी धरणात 62.61 टक्के साठा झाला आहे.
धरणातून भोगावती नदी पात्रात 1200 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.