Kolhapur Rain Update: पंचगंगा नदी चाळीशीच्या उंबरठ्यावर; कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवर; उभ्या पिकांना पाण्याचा वेढा
मागील सहा दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 39.8 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली.
सर्वाधिक पावसाची नोंद चंदगडमध्ये 87.5 मिलिमीटर इतकी झाली.
पंचगंगा नदी आज (24 जुलै) दुपारी 12 वाजेपर्यंत 39.9 फुटांवर पोहोचली आहे. नदी इशारा पातळीवर वाहत आहे. धोका पातळी 43 फुट आहे.
आज (24 जुलै) सकाळी 11 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु आहे.
जिल्ह्यात एका राष्ट्रीय महामार्गासह 29 मार्ग बंद आहेत.
जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 राज्य मार्ग असून यामधील 9 मार्ग बंद पडले आहेत.
जिल्ह्यामध्ये एकूण 122 जिल्हा मार्ग आहेत. त्यामधील 20 मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे 29 मार्गांवरील वाहतूक पाणी आल्याने बंद पडली आहे.
यामध्ये वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 14 मार्गावरील एसटी सेवा बंद आहे.