‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत पन्हाळ गडावर तीन हजारांवर विद्यार्थ्यांची हजेरी

‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत पन्हाळ गडावर तीन हजार विद्यार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी हजेरी लावली. यानंतर झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून झाली.

Jai Shivaji Jai Bharat padyatra at Panhal fort in kolhapur

1/10
महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती अलोट उत्साहात साजरी करण्यात आली.
2/10
‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत पन्हाळ गडावर तीन हजार विद्यार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी हजेरी लावली.
3/10
यानंतर झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून झाली.
4/10
ऐतिहासिक पन्हाळ गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी झाली.
5/10
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्याहस्ते झाले.
6/10
यावेळी आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सारथीच्या सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, प्रांत अधिकारी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली मडकर, नगरपालिका अधिकारी श्री. माळी उपस्थित होते.
7/10
दुसरीकडे, करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक रितिरिवाजामध्ये आज शिव जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला.
8/10
ऐतिहासिक भवानी मंडप येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील शिवमंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली.
9/10
या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला.
10/10
यावेळी शाहिर आझाद नायकवडी यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थित रोमांचित झाले.
Sponsored Links by Taboola