कोल्हापूर रेल्वे स्थानक पुनर्विकासाचे ऑनलाईन भूमिपूजन, 43 कोटींच्या निधीतून चेहरा बदलणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (6 ऑगस्ट) देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचा ऑनलाईन भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये कोल्हापूर रेल्वे स्थानकांचा समावेश होता.
कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्र सरकारने 43 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
कोल्हापूर रेल्व स्थानकावर विकासकामे केली जाणार आहेत.
महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे
त्यातून राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून या स्थानकांमध्ये मूलभूत पायाभूत तसेच अद्ययावत सुविधा आणि रेल्वे मार्गांची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल व विकास सर्वसमावेशक होईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.
पुणे रेल्वे विभागातील आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव रेल्वे स्टेशनचा या योजनेतून चेहरा बदलणार आहे..
यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी येथे निबंध आणि चित्रकला स्पर्धा