Nitin Gadkari: नितीन गडकरी यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगडकरी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
यावेळी गडकरींसोबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नितीन गडकरी, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.
गडकरी यांच्या हस्ते बहुचर्चित बास्केट ब्रिजची पायाभरणी करण्यात येणार आहे.
या ब्रिजसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला होता.
पायाभरणीनंतर भाजप कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
नितीन गडकरी भीमा कृषी प्रदर्शनालाही भेट देणार आहेत.
शिरोळ तालुक्यातील एका कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत.
नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पेठ सांगली रस्त्याचे चौपदरीकरणासाठी भूमिपूजन केले.
सांगली शहराला पुणे बंगळुरू महामार्गास जोडणारा पेठ- सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता.
हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता.
या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही, अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला आहे.