Kolhapur news: मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सपत्नीक घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रशासक राहुल रेखावार यांनी अंबाबाई देवीचा फोटो फ्रेम देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमोल महाडिक आदी उपस्थित होते.

Kolhapur news

1/10
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सपत्नीक करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले.
2/10
देवस्थान समितीच्या वतीने प्रशासक राहुल रेखावार यांनी अंबाबाई देवीचा फोटो फ्रेम देऊन त्यांचा सत्कार केला.
3/10
यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमोल महाडिक तसेच सत्यजित ऊर्फ नाना कदम, समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.
4/10
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यात केलेल्या थेट टिप्पणीमुळे गोकुळमधील सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
5/10
गोकुळ दूध संघाच्या कारभारामध्ये अनियमितता आढळली आहे, त्याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
6/10
विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'गोकुळ'बाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
7/10
त्यानुसार लेखापरीक्षणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात अनियमितता दिसून आली आहे. यासंदर्भात गोकुळ प्रशासनाकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
8/10
मात्र, अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, पण प्राथमिक अहवालात अनियमितता स्पष्ट झाल्यास गोकुळवर कारवाई केली जाणार आहे.
9/10
मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल अशी अपेक्षा असल्याचे पाटील म्हणाले.
10/10
राजू शेट्टी यांनी रेटकार्ड जाहीर करताना बदल्यांवरून तोफ डागली होती. यावरून विखे पाटील यांनी खोचक टिप्पणी करताना शेट्टी उसाचे आंदोलन सोडून महसूलकडे आले असल्याची प्रतिक्रिया दिली.
Sponsored Links by Taboola