Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मंत्री हसन मुश्रीफांनी केली स्वच्छता
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मंदिर स्वच्छतेचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हसन मुश्रीफ यांनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम केली.
स्वच्छता मोहीम कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त के. मंजुलक्ष्मी मंदिर परिसरात उपस्थित होते.
यावेळी अंबाबाई मंदिरात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
अनेक वर्षांपासून देशवासियांची इच्छा होती की राममंदिर व्हावं, असे मुश्रीफ म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे राम मंदिर तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
मी रामाचा राम माझा अशी भावना सगळ्यांची आहे, कागलमध्ये 1 लाख लोकांना प्रसाद दिला जात असल्याचे ते म्हणाले.