रणरणत्या उन्हातही जोतिबाच्या तिसऱ्या खेट्याला भाविकांची मोठी गर्दी

Jotiba Kheta : कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करत रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. खेट्याचा आज तिसरा

Jotiba third kheta

1/10
माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगर जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.
2/10
दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या तिसऱ्या खेट्याला आज रविवारी (26 फेब्रुवारी) मोठी गर्दी झाली.
3/10
उन्हाच्या झळा बसत असताना भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती.
4/10
माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.
5/10
कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करत रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते.
6/10
हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात.
7/10
जोतिबाला वर्षभर प्रत्येक रविवारी चालत जाण्याच्या उपक्रमाला साडेतीन ते चार दशकांचा इतिहास आहे.
8/10
सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक जात होते.
9/10
मात्र, कालांतराने त्यांची संख्या हळूहळू वाढत गेली.
10/10
श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते.
Sponsored Links by Taboola