Radhanagari Dam : राधानगरी धरण भरले, सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला, कोल्हापूरची धास्ती वाढली
कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहू लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्रभर नदीची पाणी पातळी स्थिर असली तरी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.
सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फूट 1 इंच इतक्या धोका पातळीवर आहे.
राधानगरी धरण सुद्धा 100 टक्के भरलं आहे. सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.
धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे.
त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, तुळशी धरण 84 टक्के भरले असून तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम धरण सांडव्यावरून कधीही विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.