Kolhapur Rain Update : राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद; जंगमहट्टी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधरणाच्या 5 आणि 6 नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होता.
आज सकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी पाचव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला.
त्यानंतर सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी सहाव्या क्रमांकाचा दरवाजाही बंद झाला.
सध्या केवळ पाॅवर हाऊसमधून 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी मध्यम प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे.
यापूर्वी तालुक्यातील घटप्रभा व जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
त्यामुळे उन्हाळ्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुलभ झाला आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वेगाने कमी होत आहे.
गगनबावडा, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.