Photo : कोल्हापूरच्या तरुणाची यशोगाथा... व्यवसायातून केली परिस्थितीवर मात, दोन महिन्यात लाखोंची कमाई

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील तरूणाने हटके व्यवसायातून दोन महिन्यात लाखो रूपयांची कमाई केली आहे.

Santosh Vader

1/10
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते या गावातील संतोष वडेर या तरूणाने अनोख्या पद्धीतीने व्यवसाय करून अवघ्या दोन महिन्यात लाखो रूपयांचं उत्पन्न मिळवलंय.
2/10
संतोष वडेर यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलंय.
3/10
शिक्षणानंतर त्यांनी नोकरी केली. परंतु, नोकरीतून कुटुंब चालवण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी वेगळ्या वाटेनं जाण्याचं ठरवलं.
4/10
संतोष यांनी व्यवसाय करायचं निश्चित केलं आणि त्यावर त्यांनी अभ्यासाला सुरूवात केली. परंतु, आपला व्यवसाय इतरांपेक्षा हटके केला तर तो चांगल्या पद्धतीने चालेल असं त्यांना वाटलं.
5/10
संतोषचं आळते हे गाव रामलिंग मंदिर आणि कुंथूगिरीच्या पायथ्याशी आहे. याच भौगोलिक रचनेतून त्यांना अनोखी कल्पना सूचली.
6/10
आळते याच गावी संतोष यांनी 2017 मध्ये आद्य मराठी खाद्य मराठी नावांचं हॉटेल सुरू केलं. या हॉटेलमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील आणि चुलीवरचं रूचकर जेवण देण्यास सुरूवात केली. यातूनच नंतर त्यांनी तेथेच संस्कृती पर्यटन केंद्राची सुरूवात केली. या पर्यटन केंद्रावर आता देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत.
7/10
हा व्यवसाय सुरू करताना संतोष यांना अनेक अडचणी आल्या. परंतु, सर्व अडचणींवर मात करून संतोष यांनी खूप कमी दिवसात भरारी घेतली.
8/10
संस्कृती पर्यटन केंद्रावर संतोष यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली हुरडा पार्टी सुरू केली. शिवाय तेथे बैलगाडी, विविध पक्षी, चूल अशा गोष्टींच्या सहाय्याने एक गावच उभा केलाय. त्यामुळे शहरातील लोकांसाठी हे पर्यटन केंद्र एकपर्वणीच बनलंय.
9/10
हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांना जंगल ट्रेक, मॅजिकल शो, डान्ससह वेगवेगळ्या खेळांचं आयोजन केलं जातं.
10/10
हॉटेलसाठी संतोष थेट शेतकऱ्यांपासूनच पालेभाज्यांची आणि फळांची खरेदी करतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना देखील चांगला फायदा होतो. सध्या हुरड्याचे दिवस आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात हुरडा पार्टीतूनच जवळपास लाखो रूपये कमावल्याचे संतोष सांगतात.
Sponsored Links by Taboola