PHOTO : फुलव पिसारा नाच... अन् मोराचा पिसारा फुलला
अजून पाऊस काही पडत नाही, पण सकाळी आभाळ भरुन आलेलं मोराने पाहिलं आणि लगेच फुलवला पिसारा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे दृश्य पाहताच 'नाच रे मोरा नाच' हे गाणं आपोआप ओठांवर आलं.
कोल्हापुरातील गोखले कॉलेजजवळ असलेल्या वनराई रेसिडेन्सी परिसरात आज सकाळी हे मनोहरी दृश्य पाहायला मिळालं.
अथर्व समीर देशपांडे या युवकाने आपल्या मोबाईलमध्ये नाचणारा मोर कैद केला आहे.
पिसारा फुलवून नाचणारा मोर बघणं म्हणजे विलक्षण बाब असते.
रंगीत पिसारा आणि डौलदार मानेमुळे मोराने पैठणी या महावस्त्रावर मानाचं स्थान मिळवलं आहे.
मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. सरकारने 26 जानेवारी 1963 रोजी मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलं.
मोराची लांबी साधारण 100 ते 125 सेमीपर्यंत असते तर त्याचा पिसारा 195 ते 255 सेमी लांब असू शकतो.
मोरांना कधीही पाहिलं तरी मनाला प्रसन्नता मिळते.
भारताप्रमाणेच शेजारी म्यानमार देशाचा राष्ट्रीय पक्षी मोरच आहे.