Hasan Mushrif : टाळ मृदंगाच्या निनादात अन् जयघोषात तल्लीन झाले मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथील ग्रामस्थांची पंढरपूरला पायी वारी निघाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेत मंत्री हसन मुश्रीफ सहभागी झाले.
टाळ मृदंगाच्या निनादात विठोबा रखुमाई च्या गजराने सारा गाव दुमदुमला.
या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीत सहभागी वारकऱ्यांना हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने रेनकोटांचे वाटप करण्यात आले.
लिंगनूर, बिद्री, बेलेवाडी मासा येथे दिंड्यांचे पूजन करण्यात आले.
कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील वारकऱ्यांना 25 हजार रेनकोटांचे वाटप करण्यात आले.
दुसरीकडे, लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हळुहळु वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत.
आजपासून भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे.
याबाबतची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.