PHOTO : डोळ्याचं पारणं फेडणारी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा!
अंबामाता की जय...चा गजर, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अशा मंगलमय वातावरणात करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रात अष्टमीच्या दिवशी देवी शहरवासीयांच्या भेटीला बाहेर पडते अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या नगरप्रदक्षिणेत देवीच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी होते.
भालदार, चोपदार, रोषणनाईक असा शाही लवाजमा, फुलांनी सजलेले चांदीचे वाहन आणि त्यात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती अशा मंगलमय वातावरणात रात्री कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा झाली.
तोफेची सलामी दिल्यानंतर महाद्वारातून आंबाबई देवीचे वाहन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडले.
आकर्षक आणि रंगीबेरंगी विद्युत प्रकाशझोताने मार्ग उजळून निघाला होता.
नगरप्रदक्षिणा मार्गावर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भक्तांनी रांगोळी, फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.
महाद्वारातून वाहन गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आले. या ठिकाणी श्री अंबाबाई आणि तुळजाभवानीची भेट झाली. त्यानंतर छत्रपती घराण्याने आरती केली. तिथून वाहन गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले.
बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास पुन्हा महाद्वारात आले आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली.
गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे फक्त मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा नगरप्रदक्षिणा सोहळा पार पडला होता. यावेळी मात्र या सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.