Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
श्री श्रेत्र जोतिबा डोंगरावर आज भलामोठा दगड रस्त्यावर घसरून आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावरून यमाई मंदिराकडे जाताना हा दगड रस्त्यावर आला.
रस्त्यावर आलेला दगड जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
दरम्यान, कोल्हापूर शहरात पावसाची संततधार सुरु आहे.
ल्ह्यात काल दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 74.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ बंधारा पाण्याखाली आहे.
वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव बंधारा पाण्याखाली आहे.
भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली असे 14 बंधारे पाण्याखाली आहेत.
दुसरीकडे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे.
वारणा, चांदोली भागात पावसाचा जोर वाढल्याने नदी काठावरच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.