कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीला पुणेकर भक्ताकडून चांदीचे तोरण अर्पण
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त येत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंदिरात भरभरुन दान देण्यासह उपयुक्त वस्तूही भक्तांकडून भेट देण्यात येतात.
अशाच एका पुणेकर भक्ताने अंबाबाईसाठी भेट दिली आहे.
पुणे येथील देवीचंद अग्रवाल या भक्ताने 5 किलो 832 ग्रामचे चांदीचे तोरण अर्पण केलं आहे.
सदर तोरणाची अंदाजी किंमत रू 4,94,188 रुपये इतकी आहे.
त्यामुळे देवीची दर्शनी बाजू आणखी आकर्षक झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच मंदिरात इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे एक लाख रूपये किमतीचे दोन वॉटर कुलर्स प्रदान करण्यात आले.
‘इनरव्हील''च्या अध्यक्षा डॉ. विद्या पठाडे यांच्या हस्ते हे कुलर्स देवस्थान समितीकडे देण्यात आले.
भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने ‘इनरव्हील''च्या अध्यक्षा डॉ. पठाडे यांनी पुढाकार घेतला आणि किमान दोन वॉटर कुलर मंदिरात बसवण्याचे नियोजन करण्यात आले.
दरम्यान, गेल्या महिन्यात भाविकांनी तब्बल 62 लाख 36 हजार 830 रूपये इतके दान अर्पण केले आहे.
मंदिरातील दानपेट्यातील रक्कमेची गेल्या तीन दिवसांपासून मोजणी सुरू होती.
देवस्थान समितीच्या वीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली.