Kolhapur Airport : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु; पहिल्याच दिवशी विमान हाऊसफुल्ल
कोल्हापूर- मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टार एअरचे पहिल्याच दिवशी विमान हाऊसफुल्ल झाले.
स्टार एअरवेज या कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस सुरु झाली आहे.
पहिल्या दिवशी मुंबईहून कोल्हापूरला 33 तर कोल्हापुरातून मुंबईला 31 प्रवाशांनी प्रवास केला.
आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार यादिवशी ही सेवा सुरु राहिल.
चार दिवस विमानसेवा सुरु झाल्यामुळे प्रवासी समाधानी आहेत.
स्टार एअरची कोल्हापूर- मुंबई विमानसेवा मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी तीन दिवस सुरु होती.
सातही दिवस ही विमानसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
आता आठवड्यातील चार दिवस विमान सुरू झाल्यामुळे कोल्हापुरातील प्रवाशांची सोय होणार आहे.
आता बुधवारीही मुंबईसाठी कोल्हापुरातून विमान उड्डाण करेल.