Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आमदार जयश्री जाधवांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज (3 ऑगस्ट) विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत लक्ष वेधले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन, लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही निर्णय झालेला नाही.
आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, असा बॅनर विधानसभेच्या पायऱ्यांवर झळकावत राज्य सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मार्च महिन्यामध्येही त्यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची मागणी केली होती.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ 50 वर्षांपासून रखडली आहे.
त्यातून राज्य व केंद्राच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत असल्याने विकास खुंटला आहे.
महापालिकेने 2013 पासून 2021 पर्यंत चारवेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. 2014 मध्ये 17 गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्या साऱ्यांवर सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागवला होता.
त्यानुसार फेब्रुवारी 2021 मध्ये 18 गावे व दोन एमआयडीसींसह प्रस्ताव सादर केला आहे.
त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शहराची वाढ नसल्याने नवे उद्योग येत नाहीत.