Kolhapur : ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक, अभिनेत्याचा अश्रूंचा बांध फुटला
कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग लागली. आगीच्या प्रचंड ज्वालांनी नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरंगमंचापर्यंत आग पसरली आहे.
यामुळे नाट्यगृह नामशेष झाले असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
शॉकसर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती आहे
राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती.
शाहू महाराज यांच्या कालावधीत पॅलेस थिएटर म्हटले जाई.
शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे.
थिएटरला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
महापालिका यंत्रणा, अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे. त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जात आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहावर कोट्यवधींचा खर्च देखील करण्यात आलाय.