Eknath Shinde In Kolhapur: मागील अडीच वर्षाच्या सरकारने ब्रेक लावला, मी आणि देवेंद्रजी येताच सर्व स्पीडब्रेकर हटवले

कोल्हापुरात शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली.

शिंदे यांनी बोलताना पंचगंगा प्रदुषण मुक्तीचा निर्धार बोलून दाखवला.
योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे ते म्हणाले.
आतापर्यंत घेतलेल्या 35 ते 40 कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दीड लाख लाभार्थ्यांची नोंद कोल्हापुरात झाली आहे. यामधील 60 हजार लाभासाठी आल्याचे ते म्हणाले.
सिंचन प्रकल्प मंजूर होत नव्हते, आमच्या सरकारने 29 प्रकल्प मंजूर केले आहेत.
महिलांसाठी योजना केल्या आहेत. पीएम किसान योजनेत आणखी 6 हजार वाढवले, 12 हजार मिळणार आहेत. हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरातील टोल बंद करणारा एकनाथ शिंदे होता, यासाठी धाडस लागते असेही शिंदे म्हणाले.
लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सहकारी मंत्री हे सगळ्यांचे श्रेय आहे आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ आमच्या सरकारला दिलं असल्याचे त्यांनी सांगितले.
अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देत आहोत. हे सर्व प्रकल्प कोट्यवधी लोकांना दिलासा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुळेच लोकांनी खऱ्या शिवसेना भाजप सरकारला पसंती दिल्याचे ते म्हणाले.