Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर सर्किट बेंचसाठी लगीनघाई; पुढील तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी

Kolhapur Circuit Bench: 18 ऑगस्टपासून याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होणार आहे. 17 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणार आहे.

Continues below advertisement

Kolhapur Circuit Bench

Continues below advertisement
1/10
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.
2/10
इमारतीची सुरू असलेली कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
3/10
आबिटकर यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील प्रस्तावित सर्किट बेंच इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.
4/10
आबिटकर यांनी यावेळी तिन्ही इमारतींच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या तीन कोर्ट रूम्सची पाहणी केली.
5/10
यावेळी त्यांनी बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.
Continues below advertisement
6/10
येत्या 18 ऑगस्टपासून कामांना सुरुवात होणार असल्याने इमारतींचा ताबा न्यायालयाकडे 11 ऑगस्टला देणे आवश्यक आहे.
7/10
याबाबत पुढील तीन दिवसांत इमारत न्यायालयीन कामकाजासाठी हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
8/10
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्था या सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू होत आहे.
9/10
ते पुढे म्हणाले की, कोल्हापूरच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यवस्था लोकांना स्थानिक पातळीवर देण्यात आल्या होत्या. सर्किट बेंच कोल्हापूरात सुरू झाल्याने आपल्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
10/10
येत्या 18 ऑगस्टला हा बेंच प्रत्यक्षात सुरू होताना कोल्हापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Sponsored Links by Taboola