मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही म्हणत पोलीस कर्मचाऱ्याकडून एसटी चालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे.
Continues below advertisement
Kolhapur bus driver and police beaten
Continues below advertisement
1/7
मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही म्हणत पोलीस कर्मचाऱ्याकडून एसटी चालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे.
2/7
गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून बस चालक आणि पोलीस कारचालकांमध्ये वादावादी झाली, त्यातून बस चालकास मारहाण करण्यात आली आहे.
3/7
नितीन शिरगावकर असं मारहाण करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव असून कोल्हापूर-मलकापूर मार्गावर बस घेऊन जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
4/7
दरम्यान, याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून कंडक्टर आणि पोलीस यांच्यातील मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
5/7
बस चालकाच्या तक्रारीनंतर असिफ कलायगार या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते
Continues below advertisement
6/7
दरम्यान, या मारहाणीच्या घटनेवेळी बसमधील प्रवासी आणि स्थानिकांनी मध्यस्थी करत भांडणं मिटविण्याचा प्रयत्न केला.
7/7
व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी देखील बस चालकास भांडताना दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Published at : 12 May 2025 08:01 PM (IST)