Kolhapur Accident : कोल्हापुरात दोन गाड्यांची मागून डंपरला धडक, विचित्र अपघातात गाड्यांचा चक्काचूर

Kolhapur Accident : पुणे-बेंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघात सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

Kolhapur Accident

1/7
कोल्हापुरातील सांगली फाट्याजवळ विचित्र अपघात झाला असून त्यामध्ये दोन गाड्यांचा चक्काचूर झाला.
2/7
पुणे -बेंगळुरू मार्गावर हा अपघात झाला असून या अपघातात दोन गाड्यांचा चक्काचूर झालाय.
3/7
पुण्याच्याकडून बेंगलोरच्या दिशेला जाणाऱ्या डंपरला पाठीमागून येणाऱ्या दोन गाड्यानी जोरदार धडक दिली.
4/7
एका गाडीने मागून डंपरला जोरदार धडक दिली. त्यामध्ये गाडीचे बोनेट थेट डंपरच्या मागच्या बाजूने आत घुसले.
5/7
तर त्या मागच्या गाडीने पुढच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये मागच्या गाडीचे जबर नुकसान झालं.
6/7
यामध्ये त्या दोन गाड्यांचा चक्काचूर झाला असून सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही.
7/7
एक महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sponsored Links by Taboola