Kolhapur BJP Office: अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज कोल्हापुरातील भाजप कार्यालय आहे तरी कसं?

कोल्हापुरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी कॉन्फरन्स हॉल, अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी विशेष दालन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा सायबर विभाग, ग्रंथालय अशा विविध विभागांनी सुसज्ज करण्यात आले आहे.

Kolhapur BJP Office

1/11
भारतीय जनता पक्षाचे नूतन कार्यालय हे लोकसेवेचे केंद्र बनेल असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
2/11
कोल्हापुरातील नागाळा पार्कातील भाजपच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
3/11
भाजपचे नवीन ऑफिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे राज्यातील पहिले कार्यालय आहे.
4/11
पूर्ण राज्यातून बैठकीसाठी कोल्हापुरात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी कॉन्फरन्स हॉल, अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी विशेष दालन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा सायबर विभाग, ग्रंथालय अशा विविध विभागांनी सुसज्ज करण्यात आले आहे.
5/11
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
6/11
चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेला अंत्योदयचा मंत्र घेऊन, भाजप कार्यकर्ते अहोरात्र सेवाकार्य करत असतात.
7/11
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून भाजपचे प्रत्येक जिल्ह्यात सर्व सोईसुविधांनी सुसज्ज असे कार्यालय असावे, असा आग्रह धरला होता.
8/11
त्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे कार्यालय उभारण्यात आले आहे.
9/11
यावेळी जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित होते.
10/11
महाराष्ट्र राज्यातील भाजपचे पहिले कार्यालय कोल्हापुरात उभे राहिले आहे.
11/11
कार्यालयाच्या प्रवेशद्वारात श्री गणेशाचे मंदिर आहे, ज्याची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती.
Sponsored Links by Taboola